Hosea 8

1“मुखाला तुतारी लाव,
परमेश्वराच्या, घरावर गरुड येत आहे,
हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून
माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केले आहे.
2ते माझा धावा करतात,
माझ्या देवा, आम्ही इस्राएली तुला जाणतो”
3पण इस्राएलाने जे चांगले ते नाकारले आहे,
आणि शत्रू त्याचा पाठलाग करेल.

4त्यांनी राजे नेमले,

पण माझ्या द्वारे नाही;
त्यांनी राजपुत्र स्थापले आहे,
पण माझे ज्ञान न घेता त्यांनी,
आपले सोने व चांदी घेऊन,
स्वत:साठी मुर्त्या बनविल्या आहेत.
त्यानेच ते नाश पावतील.
5संदेष्टा म्हणतो, हे शोमरोना तुझे वासरू त्याने नाकारले आहे,
परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुध्द माझा राग पेटेल,
किती वेळ ते अशुद्ध राहणार?

6कारण ही मूर्ती इस्राएलातून आली,

कारागिराने बनवली,
ती देव नाही शोमरोनाच्या
वासराचे तुकडे होतील.
7कारण लोक वारा पेरतात
आणि वावटळीची कापणी करता,
उभ्या पिकाला कणीस नाही,
ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही,
आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली
तरी परके त्याला गिळून टाकतील.

8इस्राएलास गिळले आहे,

आता ते देशामध्ये बिन कामाची लबाडी करतात.
9कारण ते अश्शूरास रानगाढवासारखे गेले,
एफ्राहमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत.
10जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले,
तरी मी त्यांना आता एकत्र करीन.
राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील.

11कारण एफ्राईमाने पापबलींसाठी आपल्या वेद्या वाढवल्या आहेत,

पण त्या वेद्या पाप करण्याचे कारण ठरल्या आहेत.
12मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहीले,
पण ते त्याकडे अनोळख्या सारखे पाहतात.

13मला अर्पणे करावी म्हणून

ते मांस देतात व खातात,
पण मी परमेश्वर,
ते स्वीकारत नाही.
आता मी त्यांचे पाप स्मरण करून
त्यांना शासन करणार ते मिसर देशात परत जातील.
इस्राएलाला आपल्या निर्माणकर्त्यांचा विसर पडला आहे
आणि त्याने महाल बांधले आहेत,
यहूदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत,
पण मी त्याच्या शहरावर अग्नी पाठवीन,
तो त्याची तटबंदी नष्ट करून टाकेल.
14

Copyright information for MarULB